नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्र्याकडून दखल; SIT चौकशीचे आदेश

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्र्याकडून दखल; SIT चौकशीचे आदेश

Home Minister Fadnavis intervened in Trimbakeshwar temple, ordered SIT inquiry : काल नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) इतर अन्य गटाच्या लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर शहरात दुसऱ्या धर्मातील एका गटाकडून यात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात ही यात्रा थांबवून देवतेला धुप-अगरबत्ती दाखवावी, असा या गटाचा आग्रह होता. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक फलक आहे, ज्यावर हिंदूंशिवाय कोणालाही प्रवेश नाही, असं लिहिलं आहे. त्यामुळे पुजाऱ्यांनी अन्य गटाच्या लोकांना मंदिर प्रवेशासाठी विरोध केला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी (police)हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकला. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेची नोंद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाटी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले.

राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. अकोला, शेवगाव या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. या घटना ताज्या असतांनाच त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मंदिरात घुसण्याचा एक गटाने प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यावरून वाद उफाळून आला होता. या घटनेनंतर आता मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तळ ठोकून आहे. मंदिरात घुसखोरी करणाऱ्यावर कारवाईची मागणी पुरोहित संघाने केली.

त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात SIT स्थापन; फडणवीसांची मोठी घोषणा

दरम्यान, आता त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

तसेच या या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही एसआयटी केवळ या वर्षीच्या घटनेचीच नाही तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती, अशी माहिती फडणवीसांकडून ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube