Imtiyaz Jaleel : ‘छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध नाही, पण…’

Imtiyaz Jaleel : ‘छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध नाही, पण…’

छत्रपती संभाजीनगर : नाव बदलल्याने शहराचा इतिहास बदलत नाही, आता मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. खासदार जलील यांनी काल त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत जलील यांनी ही मागणी केलीय. आमचा नावाला विरोध नाही पण नाव बदलल्याने नागरिकांना अर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याचं जलील यांनी म्हंटलयं.

खासदार जलील, केंद्र सरकारने औरंगाबाद या नावाला छत्रपती संभाजी नगर करण्यास मान्यता दिली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढण्याची तयारी दर्शवली आहे. कोर्टाने २७ मार्चपर्यंत हरकती मागविल्या आहेत. त्या अगोदरच आम्ही मोर्चे आंदोलन काळे झेंडे लावणे या प्रकारचं आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशाराच जलील यांनी दिला आहे.

आमचा छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध नसून औरंगाबादच्या नागरिकांना या गोष्टी फटका बसणार आहे. औरंगाबादत्या नागिरकांना नाव बदलल्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट यावरची सर्व नावे बदलावी लागणार आहे.

Exit Poll आला! कसब्यात भाजपला धक्का तर चिंचवडमध्ये जागा राखणार!

तसेच महसूल एस.टी. महामंडळ रेल्वे जिल्हा परिषद या सर्वच कार्यालयांमध्ये नावे बदलावे लागणार आहेत. यासर्व गोष्टींसाठी खर्च येणार आहे. नाव बदलल्याने इतिहास बदलत नाही इतरही शहरं आहेत त्यांची नावं का बदलत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा समाचार; म्हणाले, ‘निष्ठावंतांनीच भगवा हाती घ्या’

कोल्हापूर, पुणे, नागपूर यांनाही महापुरुषांची नावे द्या, मुंबईलाही छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव द्या. सध्या अधिवेशन सुरू आहे तुम्ही या अधिवेशनात ठराव पारित करा कोणीही विरोध करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

मंगलदास बांदल यांची स्फोटक मुलाखत…

नूकतीच केंद्र सरकारकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली असून आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नाव करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube