येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Rain Alert : पावसाचं मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्याची रोजची रिमझिम सुरुच आहे. त्याचबरोबर राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय. महाराष्ट्रात मान्सून सर्वत्र जाण्यासाठी अजून दोन दिवस लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mansoon) दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. (Rain) मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलाय.

यलो अलर्ट      Pune Rain : पुण्यात पावसाला सुरुवात; आज  जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिलाय. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडी’ने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज

विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तसंच, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुणे, पालघर, अहमदनगर, सातारा, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

वादळी पावसाची शक्यता  Vijay Wadettiwar : झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारने.. अवयवांचे रेटकार्ड पाहून वडेट्टीवारांचा संताप

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज