‘अधिवेशन चालू झाल्यानंतर…औरंगजेब, हलाल, झटका’, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं

‘अधिवेशन चालू झाल्यानंतर…औरंगजेब, हलाल, झटका’, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं

Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केलाय.

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज कसा दाबता येईल, तो प्रयत्न झाला. तरीही आम्हाला विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडण्यात यश आलंय. सरकारला बोलते करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक विवाद निर्माण करून मंत्री आणि आमदार वेलमध्ये येतात. सत्तेचा माज या अधिवेशन पहायला मिळाला. 3 वेळा अधिवेशन बंद प्रयत्न, इतिहासात प्रथमच (Maharashtra Politics) घडले. जागतिक पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्तुस्थिती लपवण्यात ते यशस्वी होतात. भ्रष्टाचार आरोपांना बगल दिली. साडेतीन वर्षे झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. लोकशाहीचे पद्धत त्याचीच पायमल्ली करायची. सरकारने जाहीरनाम्यात सांगितले की, शेतकर्‍यांची कर्जे माफ करतो.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही तपासून पहातो. 2100 नाही, लाडक्या बहिणींना फसवलं. त्यांनी किती शेतकर्‍यांच्या आत्महत्या पाहिल्या? एक शेतकरी झाडावर चढला होता. शेतकर्‍यांशी देणेघेणे नाही. गुंतवणूक राज्यात आणली, त्याची श्वेतपत्रिका घोषीत करावी. सरकार जाणूनबुजून आपले फेक्लूअर निर्माण करण्यासाठी धार्मिक विवाद निर्माण करते. महागाईवर सरकार बोलत नाही. सरकारचे मोठे अपयश आहे. हे लपवण्यासाठी धार्मिक विवाद निर्माण केले जात आहेत.

चर्चा करतो, पण माझं ऐकलं की भलं होतं; अजितदादांची अमित देशमुख अन् विश्वजित कदमांना थेट ऑफर?

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय मिळाले? अधिवेशन चालू झाल्यानंतर औरंगजेब, हलाल, झटका यामुळे दिशा पालटली. मुख्य विषयाला बगल देण्याचे काम झाले. जनतेला सामोरे जाऊ शकत नाही. अशा युक्त्या काढल्या जातात. अशा पद्धतीने धार्मिक विद्वेष पसरवण्यात आला. पटलावरूनच खोटी माहिती द्यायची. अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळाले? त्याचे उत्तर शून्य आहे. एकही धोरण पूर्ण अधिवेशनात आलेले नाही. बेरोजगार, शेतकरी, महिलाबद्दल आले नाही.

भास्करराव जाधव यांनी म्हटलंय की, अनेक वर्षे काम करतो. काही वर्षे सत्तेत आणि काही वर्षे विरोधी पक्षात काम केले. संख्येने अल्प असलेला विरोधी पक्ष हा आमचा महाविकास आघाडी आहे. संख्येने अल्प असलो, तरी नाहीरे वर्गाचे दुःख मांडण्याचे दायित्व आवाज बुलंद केला, संख्येने कमी तरी नाही रे आवाज चर्चेने लेखाजोगा मांडला, 16 दिवस काम चालले. 147 तासांपैकी सभागृहाचा वेळ सत्ताधारी पक्षामुळे वाया गेला. 147 तास काम चालले. 9 तास काम चालले. विधिमंडळ 9 विधेयक मान्य झाली. या विधिमंडळात या विधेयकावर किती वेळ चर्चा झाली? 147 घंट्यांचा वेळ कुठे वाया गेला? शेवटी चर्चा झाली. आमचे 3 प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव 3 दिवस अगोदर संपवला जातो. त्यावर पूर्ण चर्चा झाली नाही.

सत्ताधारी ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले की, हे लक्षवेधी मंडळ झालेले आहे. जनतेच्या हिताची समस्यांची व्यथा ऐकून घेण्याची सरकारची मानसिकता नाही. अर्थसंकल्प मांडला. दिलेली आश्वासने साधाही उल्लेख बहुसंख्येने हे सरकार बेलगाम झालेले आहे. हे सरकार डोक्यात हवा घालून आहे. आज सभागृहाच्या कामकाजात 22 अशासकीय विधेयक आली. एकाही विधेयकावर चर्चा नाही. प्रति शुक्रवारी वेळ दिला जातो. त्यावर 1 मिनिटही चर्चा झाली नाही. अशा पद्धतीचे हे कामकाज चाललेले आहे. नाहीरे वर्गाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला गेला. उत्तर देण्याचा निभावला नाही. अर्थमंत्र्यांनी जनरल चर्चेवर भाषण केले.

हरामखोर आहेत ते! दिशा सालियन प्रकरणावरून भडकले पण ते वक्तव्य कुणाला उद्देशून?

जयंत पाटील म्हणाले की, मंत्री त्यागपत्र देतात. मुख्यमंत्र्यांनी घोषीत करायला हवं की, त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. संविधान पदोपदी पायदळी तुडवण्याचे काम चाललेले आहे. या निमित्ताने चिंता अशी वाटते की, 36 वर्षे काम करतो आहे. प्रचंड बहुमत असणारा काँग्रेस पक्ष पाहिला आहे. काँग्रेसने विरोधकांचा आवाज दाबण्याचा काम कधीही केलेले नाही. विधानसभा लक्षवेधी होण्याची शक्यता आहे. लक्षवेधी मांडायची उत्तरे घ्यायचे सोयीच्या लक्षवेधीच्या प्राधान्य देऊन अधिकार्‍यांना एसआयटी लावून त्यांना निलंबित करण्याचे प्रकार. एका दिवसाला 3 लक्षवेधी घेतल्या पाहिजे. लक्षवेधीचे महत्त्व अल्प झाले. आयुधे ही विरोधी पक्षाच्या बाजुने वापरली जातात, अशी देखील टीका जयंत पाटलांनी केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube