52 हजारांचा पाळणा, मोठा कार्यक्रम करा… एक महिन्याच्या बाळाच्या बारश्यापूर्वीच आईने जीवन संपवलं
Kolhapur Incidence Married women ends life कोल्हापूरमध्ये राजारामपुरीतील एका महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
Kolhapur Incidence Married women ends life before naming ceremony of a year Baby Girl : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील राजारामपुरीतील एका महिलेने काल दुपारी (रविवार, 12 जुलै 2026) गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे आपल्या एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापुर्वीच या आईने हा टोकाचा निर्णय घेतला.
किराणा, कपडे अन् मोबाईल, लोकांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? केंद्र सरकार करणार मोठा सर्व्हे
त्यामुळे आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. अस्मिता प्रतिकसिंह काटकर असे या महिलेचे नाव असून मुलीच्या बारशाची घरात लगबग सुरु असतानाच तिने ओढणीच्या साहाय्याने घरात गळफास घेतला. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी अस्मिताच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. तिच्या सासरची मंडळी म्हणजे तिचा नवरा, सासरा, सासू आणि ननंद हे तिचा पैशासाठी छळ करत होते. अस्मिताच्या लग्नापासून ते लग्नानंतरचा प्रत्येक सणसमारंभ आणि कार्यक्रम मोठ्या पद्धतीने करण्याचा तगादा तिच्या सासरची मंडळी लावायची. तसेच ते तिच्या माहेरच्यांकडून पैशांची मागणी करायचे. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांना पैसे देखील पाठवले होते, असे आरोप तिच्या आई-वडिलांनी केले आहेत.
अस्मिताच्या डोहाळे जेवणाचा खर्च, तिच्या डिलीवरीचा खर्च सर्व आमच्याकडून करुन घेतला आणि आता देखील तिच्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशासाठी अस्मिताच्या सासरच्यांनी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑर्डर केला होता. त्याचे पैसे ते आमच्याकडे मागत होते. असे आरोप तिच्या आई-वडिलांनी केलेत. शिवाय तिच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होतो पण अस्मिताला मुलगी झाली. त्यांनी मुलाचे कपडे देखील घेतले होते पण मुलगीच झाली, त्यामुळे ते तिचा छळ करत होते. असे आरोपही अस्मिताच्या आई-वडीलांनी केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.