ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्याआधीच संजय कदमांना ACB ची नोटीस

  • Written By: Published:
ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्याआधीच संजय कदमांना ACB ची नोटीस

रत्नागिरी : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) यांना एसीबीने (ACB) नोटीस बजावली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना शह देण्यासाठी संजय कदमांना पक्षात घेणे ही ठाकरे गटाची खेळी असून ते पुढील १५ दिवसांत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

संजय कदम ठाकरे गटात आल्यानंतर कोकणातील ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी संजय कदम यांचा ठाकरे गटाला फायदा होणार आहे. दरम्यान, अशाचत त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याअगोदर कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजेश साळवी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक या दोघांची एसीबीकडून चौकशी सुरु आहे.

Health Tips : ही हिरवी चटणी कोलेस्ट्रॉलपासून देईल मुक्ती … अशा प्रकारे सेवन करा

मिळालेल्या माहितीनुसार, सन 2014 ते 2019 या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना संजय कदम यांनी बेकायदेशीरपणे इमारती व क्रशर उभारल्याची तक्रार झाली असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. इमारत बांधताना विहीर बुजवल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली असून माजी आमदार संजय कदम हे या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता एसीबीची (ACB) नोटीस निघाल्याने दापोली विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube