‘ते आभाळ भीष्माचं होतं’ महाकादंबरीला ‘र. वा. दिघे स्मृती’ पुरस्कार जाहीर
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका
‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस यापूर्वी ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ ठाणे या संस्थेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मराठी आणि गुजराती मिळून 60 नाटकांपेक्षा अधिक नाटकांचं लेखन करणारे नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, दूरदर्शन मालिकांचे लेखन करणारे अशी ओळख असणाऱ्या अशोक समेळ यांची आता महाकादंबरीकार अशी नव्यानं ओळख होऊ लागली आहे.
बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
या महाकादंबरीपूर्वी त्यांनी मी अश्वत्थामा, चिरंजीव ही महाकादंबरी लिहिली होती. त्याच्या आजवर सात आवृत्या संपल्या. आठवी लवकरच प्रकाशित होणार आहे. या महाकादंबरीस महाराष्ट्रातील मानाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले होते.
अशोक समेळ यांनी या कादंबरीमध्ये नाट्यात्मक संवाद, कथानकाचा कालपट, सघनसार्थ भाषा व भीष्माचे तरलतम् अंतरंग या चार दिग्गजांवर पेललेले ते आभाळ भीष्मांचं होतं कांदबरीचं लिखाण केलं आहे.