कोकणात वाशिष्ठी नदी इशाऱ्याच्या पातळीवर; पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत

कोकणात वाशिष्ठी नदी इशाऱ्याच्या पातळीवर; पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत

Kokan Rain Update : गेल्या काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. दापोली-खेड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे दरम्यान हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Kokan Rain update Vashishti river at risk Mumbai Local too Disturb )

धनुभाऊंसाठी शेलारांची बॅटिंग; तर विरोधी नेतेपदासाठी थोरात, चव्हाण अन् वडेट्टीवारांकडून प्रश्नांची सरबत्ती

पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत :
दुसरीकडे या पावसाचा फटका मुंबईची लोकल सेवेला देखील बसला आहे. पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात काल मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. तर याचा मोठा फटका हा मध्य आणि हार्बर रेल्वेला बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यानचा वाहतूक ठप्प झाली आहे. तर अंबरनाथ ते बदलापूरची रेल्वे वाहतूक बंद आहे.

‘मावळ’ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं शिलेदार हेरला; बुट्टे पाटलांना जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा :
दरम्यान कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube