शरद पवार यांना सोडणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक; भास्कर जाधवांची कबुली
MLA Bhaskar Jadhav: शरद पवार यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल हे मला अजिबात वाटत नाही. मी हे दहावेळा सांगितले आहे.

MLA Bhaskar Jadhav On Sharad Pawar: शिवसेना (Shivsena)उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav) हे बेधडक आणि बिनधास्त बोलणारे नेते आहेत. शरद पवार ( Sharad Pawar) यांची साथ सोडणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली भास्कर जाधव यांनी दिली आहे.
झी 24 तासला दिलेल्या एका मुलाखतीत भास्कर जाधवांनी ही कबुली दिलीय. 2019 मध्ये महाविकास आघाडीसरकारमध्ये तुमच्या मंत्रीपदाला शरद पवार यांनी विरोध केला असेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल हे मला अजिबात वाटत नाही. मी हे दहावेळा सांगितले आहे. पुन्हा तेच सांगतो. जर मी पवारसाहेबांना सोडून मी शिवसेनेत आल्यामुळे त्यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केले आहे. काही चुकीचे त्यांनी केले नसेल.
महायुतीत ट्विस्ट! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या हाती धनुष्यबाण; विधानसभेत केली होती बंडखोरी
ज्या माणसांने मला पक्षात घेतले. ज्या पक्षात (शिवसेना) मी होतो त्या पक्षाचा उमेदवारी मिळविण्याच्या लायकीचा नव्हतो. शरद पवार यांनी मला त्यांच्या पक्षात घेतले. राज्याचा सरचिटणीस केले. विधानपरिषद मला दिली, निवडून आणले. विधानसभा मला दिली निवडून आणले. मला मंत्रिमंडळात घेतले. मला पक्षाचे अध्यक्ष केले. मला कॅबिनेटमंत्री केले. त्या माणसाला मी सोडल्यानंतर जर त्या माणसाने माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल ते त्यांनी बरोबरच केले, असे ते म्हणाले. मी पवारसाहेबांना सोडून येणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूकच आहे. हे मी शिवसेनेत असताना बोलतोय. कदाचित येथेही मला हे बोलण्याची किंमत भोगावी लागेल, ते म्हणाले. (MLA Bhaskar Jadhav On Sharad Pawar)
शरद पवारांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला नसेल-भास्कर जाधव
पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर सांगण्याचे नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो पवारसाहेबांनी नक्कीच माझ्या मंत्रिपदाला विरोध केलेला नसेल, कारण त्यांचे माझ्यावर आजही प्रेम आहे. एक मात्र मी सांगतो अनेक जण पवारसाहेबांना सोडून गेले आहे. त्यांनी त्याची खंत बाळगले नाही. मी मात्र त्यांना सोडून गेल्याचे दुखः त्यांना झाले. हे मला नंतर कळले. माझे राजकीय हित सांभाळण्याचे काम पवार यांचे नव्हते. त्यांनी जर तसे केले असेल तर हे चूक नाही. माझ्या राजकीय हित जोपासणे काम मी ज्या पक्षात असतो, त्यांचे असते, असे भास्कर जाधव म्हणाले.