Ravindra Chavhan : पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार शिक्षकच

  • Written By: Published:
Ravindra Chavhan : पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार शिक्षकच

मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

शिक्षक मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या भागातील ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली. तर विविध संघटनांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते आणि हे सर्व जन आपला आमदार हा शिक्षकच असला पाहिजे या भावनेतून सगळ्या लोकांनी काम केले. आम्हाला खात्री होती, युतीचे कार्यकर्ते एकत्र निवडणूक लढतात तर विजय नक्कीच युतीचा होतो. गेली सहा वर्ष या मतदार संघाच नेतृत्व हे शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच करायचा आणि पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच झाला आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले

तसेच यावेळी विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफळ झाला आहे. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय सुकर झाला. हा शिक्षकांचा, 33 संघटनांचा विजय आहे. मला 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. जो कोटा गरजेचा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर दिली. “आझाद मैदानावर आंदोलनं करुन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube