महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता; बारसुतील प्रकरणावरून राऊत आक्रमक

  • Written By: Published:
महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता; बारसुतील प्रकरणावरून राऊत आक्रमक

“कोकणातील बारसु येथे रिफायनरी (Barsu Refinery) विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे.

या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली आहे. मात्र या अटकेविरोधात आता विविध संघटना मैदानात उतरल्या आहेत.

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

त्यांनी एका पत्राद्वारे या अटकेचा निषेध करत या आंदोलकांना तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेंच्या रिफायनरी विरोधी ठराव असूनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन सर्वेक्षण करण्यास सरकार प्रचंड पोलीस बळाचा वापर करत आहेत. यांच्याविरोधात संजय राऊत आता आक्रमक झाले आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी लिहाल आहे की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत. आणि इकडे कोकणातील बारसु येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता. हा काय प्रकार आहे?”

मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत

“बारसू मध्ये रिफायनरी (Barsu Refinery) व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत.” असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिल आहे. बरसू मध्ये आज रिफायनरी सर्व्हे विरोधात आंदोलन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते.

बारसू मध्ये रिफायनरी व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यंमत्री असताना केंद्र सरकाराला यासाठी पत्र लिहलं होत. आता संजय राऊत यावर टीका करत आहेत पण स्थानिक आमदार यांच्या विरोधात बोलत नाहीत. त्यामुळे अशी दुट्टपी भूमिका समोर येत आहे. लोकांना ते कळत आहे. अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube