Barsu Refinery : स्थानिकांचा विरोध का? हे समजून घेतलं पाहिजे; सामंताच्या भेटीनंतर पवारांचा मोलाचा सल्ला
बारसू मध्ये पोलीस दलाचा वापर केला गेला, अशी आमची तक्रार होती. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता तिथे कोणत्याही प्रकारचा पोलीस बळाचा वापर केला जात नसल्याची माहिती दिली आहे. याशिवाय सध्या तिथे कोणतेही काम होत नाही, फक्त त्या ठिकाणी काही भागात माती परीक्षण होत आहे, अशी माहिती आज उद्योग मंत्र्यांनी भेटून दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
याच मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की राज्य सरकारकडून आंदोलकांची भूमिका समजून घेण्यासाठी सरकार आणि आंदोलक यांची बैठक घेतली पाहिजे. असं उद्योग मंत्र्यांना सांगितलं आहे. त्यावर ते उद्या राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि आंदोलक प्रतिनिधी यांच्यात चर्चा करून ती माहिती सरकारला देतील, असं ठरलं आहे.
Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं
विरोध का आहे, हे समजून घेतलं पाहिजे
स्थानिक लोकांशी मी अजून बोललो नाही, त्यामुळे इतकं सांगू शकत नाही. पण राज्यात एखादा मोठा प्रकल्प होत असेल तर स्थानिक लोकांचा विरोध का आहे, हे समजून घेतलं पाहिजे. याशिवाय आंदोलकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जाणार का ? या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की मी स्वतः त्या ठिकाणी जाणार नाही, पण माझ्या पक्षाचे लोक जाणार आहेत.
त्याचे दौरे मी कसे सांगणार?
केंद्रीय मंत्री अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मागच्या काही दिवसात अमित शाह यांचे दौरे वाढले आहेत. या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की ते केंद्रीय मंत्री आहेत. ते दौरे करू शकतात. त्यांच्या दौऱ्याविषयी मी काय सांगणार.
एक आमदार तरी निवडून आणा
राज्यात काही दिवसापूर्वी तेलंगणाचे मुख्यंमत्री केसी आरची यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी “अबकी बार किसान सरकार” अशी घोषणा दिली होती. त्यावर देखील शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते राजकीय पक्ष चालवतात. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण किमान एक आमदार तरी निवडून आणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला