Teacher Constituency Kokan : शेकापचा कोकणातला शेवटचा बुरुज ही ढासळला, शेकाप आणि भाई जयंत पाटील एकाकी का पडले?

  • Written By: Published:
Teacher Constituency Kokan : शेकापचा कोकणातला शेवटचा बुरुज ही ढासळला, शेकाप आणि भाई जयंत पाटील एकाकी का पडले?

मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले.

या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी सोबतआघाडी झाली होती. या भागात महाआघाडीला मानणाऱ्या नेत्याच्या भारती विद्यापीठ, डी वाय पाटील विद्यापीठ, रयत, पी जी पोल शिक्षण संस्था, सह्याद्री शिक्षण संस्था या सारख्या मातब्बर संस्था आहेत. शिवसेनेच्या शिक्षक गट सोबत असताना बलराम पाटील यांचा पराभव होणे म्हणजे घरात मतएक्य अथवा एकमेकांवर विश्वास नसणे याच उत्तम उदाहरण आहे.

भाई जयंत पाटील एकाकी का?  लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना तिकीट मिळावं यासाठी जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याचं समोर आल होत. या निवडणुकीत पार्थचा पराभव झाला याचा राग देखील जयंत पाटील यांच्यावर असल्याचं समोर आल होत. कारण आघाडी सरकार असताना जयंत पाटील यांना स्वतःच्या कारखान्यासाठी कर्ज घेंताना अजित पवार यांच्या कार्यालयाचे उंबरठे ओलांडताना अनेकांनी पाहिलं. तर अजित पवारांचे कट्टर साथीदार असलेले सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे पालकमंत्री असताना भाईं जयंत पाटील कायम आक्रमक राहिले, तटकरे आणि पाटील वाद चांगलाच रंगला. याचा वचपा या निवडणुकीत निघाला का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या निवडणुकीत तटकरे कुठे होते, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार का आले नाहीत. याची उत्तर भाई जयंत पाटील यांना द्यावी लागणार आहेत.

शेकाप हा तसा सेनेचा मित्र पण लोकसभा निवडणुकीत तो काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेला. त्यावेळी शिवसेनेची नाराजी ओढवून घेतली होती. सेनेची ती नाराजी  देखील अजूनही कायम  होती का? एकीकडे भारती विद्यापीठ सारखी मोठया संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या वैद्यकीय महाविद्यालय अडचणीत आहे. तर सासरे सीबीआय कोठडीत आहेत. याचा परिणाम विश्वजीत कदम याना गप्प बसण्यास कारणीभूत ठरला का? ही देखील एक बाजू आहे.

या समोरच्या बाजू असताना भाई जयंत पाटील यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका या देखील शेकापच्या मुळावर उठल्या आहे का? शेकाप तसा काँग्रेस चा वैचारिक शत्रू, शत्रू ला धडा शिकवण्याचा नादात राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. राष्ट्रवादीं सोबत जमलं नाही म्हणून शिवसेना सोबत मैत्री केली. आमदार कोट्यातल्या स्वतःच्या विधान परिषदसाठी सर्व पक्षीय मदत घेतली. त्यामुळे कोणाला विरोध आणि कोणाला साथ याबाबत मतदार आणि कार्यकर्ते कायम संभ्रमात राहिले. याचा फटका शेकापला बसला, पण त्याच बरोबर जयंत पाटील यांची बार्गेनिग पावर कमी झाली आहे.

गेल्या निवडणुकीत सेने बरोबर असलेले भाई, आज राष्ट्रवादी बरोबर आले. गेल्या विधानसभेत हक्काच्या पाच जागा गमावल्या, आता भाई कुणासोबत मैत्री करणार ? हा देखील प्रश्न आहे.
पण सध्या तरी राष्ट्रवादीं च्या नादात शेकापचा कोकणातला शेवटचा बुरुज गेला हे नक्की..

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube