मोठी बातमी! गांजा तस्करी प्रकरणात शिवसेना महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना अटक
Lakshmi Tathe : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police) मोठी कारवाई करत शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे (Lakshmi Tathe) यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना गांजा तस्करी प्रकरणात अटक केली आहे. तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) मदतीने लक्ष्मी ताठे यांना नाशिकच्या पंचवटी परिसरातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून 2024 रोजी तब्बल 190 किलो गांजा तेलंगाणाच्या दामेरा पोलीस (Damera Police) ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पकडला होता आणि याच प्रकरणात लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये तेलंगाणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी अहमदनगर (Ahmednagar) आणि बीडमधून (Beed) दोन जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना लक्ष्मी ताठेंच नाव समोर आला होता. त्यामुळे लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
10 लाखांपेक्षा कमी किंमत, फर्स्ट क्लास फीचर्स अन् शानदार मायलेज, ‘ह्या’ कार्स एकदा पहाच
तर दुसरीकडे आता या प्रकरणात शिवसेनाकडून (Shiv Sena) स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लक्ष्मी ताठे यांची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे आता शिवसेना आणि लक्ष्मी ताठे यांच्या काहीच संबंध नाही असं शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आला आहे.
IND Vs ZIM 2024 : झिम्बाब्वेवर 23 धावांनी विजय, शुभमन चमकला, मालिकेत भारताची आघाडी