पोलिसांवर गुन्हा दाखल करा तरच अंत्यसंस्कार करू; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचं ठिय्या आंदोलन
Kharchan's death Ahilyanagar Pathardi प्रकरणी वंचितने ठिय्या आंदोलन करत पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Last rites only if a case filed against police Protest by VBA in case of Kharchan’s death Ahilyanagar Pathardi : पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर झालेल्या गोंधळादरम्यान विठ्ठल रावसाहेब खर्चन यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य नेते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयातून मोर्चा काढण्यात आला.
विकास लवांडेंना दिलासा! वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणात अखेर जामीन मंजूर
त्यानंतर आंदोलकांनी थेट पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी केली.जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत विठ्ठल खर्चन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आंदोलनामुळे काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पाथर्डी पोलीस ठाण्यात गोंधळादरम्यान उपस्थित असलेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला
सोमवारी सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर एका पीडित महिलेने व तिच्या मुलाने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या गोंधळादरम्यान उपस्थित असलेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार चोरीला..
नैसर्गिक मृत्यूची घटना नसून पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा मृत्यू झाला असा आरोप आंदोलन कडून करण्यात आला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
कृषीप्रधान देश म्हणतात अन् शेतकऱ्यांच्याच शेतमालाला भाव नाही… अण्णा हजारे
ही केवळ नैसर्गिक मृत्यूची घटना नसून पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा मृत्यू झाला असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.