सिडकोच्या 26000 घरांच्या नोंदणीसाठी दोन दिवस बाकी; नाव नोंदवून बुकिंग शुल्क किती भरावं लागत?
CIDCO New House Registration : सिडकोनं नवी मुंबईत 67 हजार घरांची निर्मिती करुन नागरिकांना विक्री करण्याची योजना आणली आहे. त्यापैकी 26 हजार घरांच्या विक्रीसाठी माझं पसंतीचे सिडकोचे घर (House) योजनेद्वारे पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत. सिडकोनं अर्जदारांना शेवटची संधी देत मुदतवाढ देखील दिली होती. त्यानुसार 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरुन अर्ज सादर करता येईल. त्यानंतर प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क भरावं लागेल.
अर्ज करण्यासाठी दोन दिवस
सिडकोनं दिलेली मुदत यापूर्वी संपली तेव्हा 55 हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलं होतं. 11 जानेवारीपासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, अर्जदारांना आणखी संधी देत मुदतवाढ देण्यात आली होती. 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरुन अर्ज सादर करता येतील. तर, प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारीची अंतिम मुदत आहे. प्राधान्यक्रम नोंदवताना 15 घरांसाठी नोंदवायचा आहे. प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना बुकिंग शुल्क 75 हजार रुपये भरावं लागेल. अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना दीड लाख रुपये बुकिंग शुल्क भरावं लागेल.
सिडकोची घरं कुठं आहेत?
अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी तळोजा, खारघर बसडेपो, बामणडोंगरी, खारकोपर आणि कळंबोली बस डेपो येथील घरांसाठी अर्ज करता येतील. तर, अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना पनवेल, खारघर, तळोजा , मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, वाशी ट्रक टर्मिनल, खारकोपर आणि खारघर या भागातील घरांसाठी अर्ज करता येतील.
अखेर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी
आर्थिक दुर्बल घटक (EWS ) गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 6 लाखांपर्यत आहे. त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 लाखापासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे. या गटामध्ये घराच्या किमती या 40 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.
सिडकोनं ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु करुन घेतली होती. मात्र, किमती जाहीर केल्या नव्हत्या. किमती जाहीर केल्यानंतर काही अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सिडकोनं नवी मुंबईतील घरांच्या किमतीचं समर्थन करत त्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
गट EWS (आर्थिक दुर्बल घटक )
तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो – 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो – 41.9 लाख
अल्प उत्पन्न गट एलआयजी
पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख
खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख