तुम्हालाही पुरावे देतो, त्यासाठी चर्चेला या, आहे का हिंमत?, रोहित पवारांचं सिरसाटांना ओपन चॅलेंज

Rohit Pawar on Sanjay Shirsat : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना बिवलकर कुटुंबाला काही एकर जमीन नियमबाह्यपणे मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला. काल त्यांनी सिडको भवनावर मोर्चाही काढला होता. दरम्यान, आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी शिरसाटांना ललकारलं.
Vaani Kapoor : जगभरातून मिळालेलं प्रेम हाच आमच्यासाठी खरा सन्मान
मी पुराव्याशिवाय बोलत नाही. भ्रष्टाचाराचे पुरावे हवे असतील तर तुम्हालाही देतो. त्यासाठी एका व्यासपीठावर या. आहे का हिंमत?, असा सवाल रोहित पवारांनी केला.
मा. संजय शिरसाठ साहेब आपण बोलण्याचीच मी वाट बघत होतो.. मलिदा खाणं, जमिनी लुटणं किंवा बिनबुडाचे आरोप करणं असले धंदे करण्याची मला गरज नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नाही… आपण बेकायदा पद्धतीने सिडकोच्या दिलेल्या १२ एकर जमिनीचे पुरावे आधीही दिले आणि हवे असतील तर तुम्हालाही देतो.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2025
रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, संजय शिरसाठ साहेब आपण बोलण्याचीच मी वाट बघत होतो.. मलिदा खाणं, जमिनी लुटणं किंवा बिनबुडाचे आरोप करणं असले धंदे करण्याची मला गरज नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नाही… आपण बेकायदा पद्धतीने सिडकोच्या दिलेल्या १२ एकर जमिनीचे पुरावे आधीही दिले आणि हवे असतील तर तुम्हालाही देतो. त्यासाठी या विषयावर जाहीर चर्चेला एका व्यासपीठावर या, असं आव्हान रोहित पवारांनी दिलं. तसेच एका व्यासपीठावर येण्याची आहे का हिंमत? मी वाट बघतोय, असंही ते म्हणाले.
Vaani Kapoor : जगभरातून मिळालेलं प्रेम हाच आमच्यासाठी खरा सन्मान
काय प्रकरण आहे?
रोहित पवार यांनी सिडकोच्या भूखंड वाटपात अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे भूखंड वाटप केल्याचा त्यांचा दावा आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार, शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना १५ दिवसांत नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी रुपयांची जमीन नियमबाह्यपणे मंजूर केली. त्यांनी या प्रकरणातील कथित गैरव्यवहारांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले असून ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरही मांडण्यास तयार आहेत.
फडणवीसांकडे मागितली वेळ..
कालही रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड देण्याचा निर्णय घेतला त्याचे सर्व पुरावे पत्रकारांना दिलेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो. त्यामुळं मी दिलेले पुरावे अभ्यासल्यानंतर आपण स्वतःहूनच या भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीत, असं ते म्हणाले.