बीडमध्ये शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक अहिल्यानगरहून पुण्याला हलवलं

Sharad Pawar यांचे नेते राम खाडेंवर जीवघेणा हल्ला झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारांसाठी अहिल्यानगरमधून पुण्याला हलवलं आहे.

Sharad Pawar

Life-threatening attack on Sharad Pawar’s leader Ram Khade in Beed; condition critical, shifted from Ahilyanagar to Pune : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पण यामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारांसाठी अहिल्यानगरमधून पुण्याला हलवण्यात आलं आहे.

नेमकी घटना काय?

बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर रात्री नगरसोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले.

हॉंगकॉंगमध्ये राहिवासी इमारतीला भीषण आग; 44 जणांचा होरपळून मृत्यू 300 जण बेपत्ता

हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तर यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे.

कोण आहेत राम खाडे?

राम खडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते आहेत. ते आष्टी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात ते सक्रिय असतात. त्यांनी भाजपा आमदार सुरेश धस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत. आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी आवाज उठवला होता.

follow us