मोठी बातमी : राजकारणात भाकरी फिरणार; शिंदे अन् अजितदादांना पवारांकडून युतीच्या टाळीचे संकेत

प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी)
Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
आदित्य ठाकरेंना शुभेच्छा अन् ठाकरेंना भेटण्याची इच्छा; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
युतीचे अधिकार कुणाला असणार?
आगामी काळातील निवडणुकांसाठी युतीसाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचाही पर्यायही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याचे सांगितले जात असून, युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपविले जाणार असल्याचे समोर येत आहे. शिवसेना (UBT) साठी मुंबई महानगरपालिका निवडणूक महत्त्वाची आहे. शिवसेना (UBT) मनसेसोबत युतीच्या शक्यतेचा विचार करत आहे, तर काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मुंबईत NCP-SP ची ताकद मर्यादित असल्याने त्यांची युती काँग्रेस किंवा इतर पक्षांशी होऊ शकते. याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छूक नसल्याचीही सूत्रांची माहिती आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा नाही. Local Body Election
CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”
अजितदादांकडूनही संकेत
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढवण्याचे संकेत तिन्ही पक्षांकडून दिले जात आहे. तर, ज्या ठिकाणी युती शक्य नाही तेथे समन्वयाने निवडणूक लढवली जाईल असे शिंदे, फडणवीस आणि अजितदादांकडून सांगितले जात आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी अजितदादांना महापालिका निवडणुकीत युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर, त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?
माझं आणि अजित पवारांचं पवित्र नातं जन्मापासून
नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या होत्या की, एकत्र येणे किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचा पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतराचा विषय येत नाही आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नसल्याचे सुप्रिया यांनी स्पष्ट केले. माझ्यावर आणि पवार कुटुंबीयांवर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राजकीय लाईनी काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांनाही हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचा खेळ नाही हे राजकारण आहे. अजित पवार आणि शरद पवार जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल असेही सुळे म्हणाल्या होत्या.