अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला पवार अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला. शशिकला पवार म्हणाल्या, “मी ग्रामपंचायत […]
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
नाशिक : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरु असणार आहे. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होणार आहे. नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक तर बारावीच्या परीक्षेसाठी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. मात्र भाजपकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. राम शिंदे म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय […]
नाशिक : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. […]
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. यातील तीन मतदार संघांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. आज […]