मोठी बातमी! ॲड. उज्ज्वल निकम यांची खासदारपदी निवड; राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, अधिसूचना प्रसिद्ध

मोठी बातमी! ॲड. उज्ज्वल निकम यांची खासदारपदी निवड; राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, अधिसूचना प्रसिद्ध

Ujjwal Nikam Latest News : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातून ही निवड करण्यात आली आहे. निकम यांच्याबरोबरच हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंद मास्टर यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडाचा निर्दोष असल्याचा अर्ज, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सविस्तर

हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत. सदानंद मास्टर केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार आहेत. भारताचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं आहे. या सर्वांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची खासदारपदी वर्णी लागली आहे. 1993 मधी बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्वाच्या केसेसमध्ये निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

प्रसिद्ध गायक गुलशन कुमार हत्याकांड, भाजप नेते प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ला, कोपर्डी प्रकरण यांसारख्या राज्यात गाजलेल्या प्रकरणांत निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. सध्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murder Case) चर्चेत आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभव

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2025) अॅड. उज्ज्वल निकम यांनी भाजपाच्या तिकीटावर नशीब आजमावले होते. निवडणुकीआधी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेशही केला होता. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्यांचा पराभव केला होता.

 माझ्या कर्तव्यात.. संतोष देशमुख प्रकरणी सरकारी वकील म्हणून नियुक्ती, उज्ज्वल निकम काय म्हणाले?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube