सभागृहात तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले…रोहित पवारांचा दावा, कोकाटेंचा चौकशी अहवाल?

सभागृहात तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले…रोहित पवारांचा दावा, कोकाटेंचा चौकशी अहवाल?

Manikrao Kokate Rummy Controversy Assembly Inquiry Report : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेत बसून मोबाइलवर ‘रम्मी’ (Rummy) गेम खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवर पोस्ट केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली (Maharashtra Politics) होती. विरोधकांनी कोकाटेंवर टीकेची झोड उठवली होती. याप्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आला आहे.

WCL च्या मैदानावर मोठा ट्विस्ट! भारत-पाक मॅच रद्द होणार? प्रायोजकांची माघार, धक्कादायक कारण…

रोहित पवारांचा दावा

आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक नवीन ट्वीट करत या संपूर्ण प्रकाराबाबत विधानमंडळाच्या चौकशीच्या अहवालाचा दावा केला आहे. रोहित पवारांनी म्हटलंय की या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय की, कृषीमंत्री कोकाटे केवळ काही सेकंद नव्हे, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे सभागृहात असताना मोबाईलवर पत्त्यांचा खेळ (रम्मी) खेळत होते. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमीभाव, खेळा रम्मी! असा संतप्त टोला विरोधकांनी लगावत, सरकारवरही प्रश्नांची सरबत्ती केली. खरंच कोकाटे सभागृहात 22 मिनिटे रम्मी खेळत होते का? रोहित पवारांचा दावा कितपत खरा आहे? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यावर काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 थेट सरकारला सवाल

रोहित पवारांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला आहे, सरकार आता तरी खुलासा करणार का? जर इतकं गंभीर प्रकरण असताना सरकार कारवाई करणार नसेल, तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा, तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का? असं देखील रोहित पवार यांनी विचारलं आहे.

काँग्रेसच्या नव्या रणनितीची सुरुवात! सपकाळ टीमला दिल्लीतून हिरवा झेंडा

चौकशी अहवालामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर दबाव वाढला असून, या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभागृहासारख्या गंभीर आणि शिस्तबद्ध वातावरणात मंत्री पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा आरोप केवळ राजकीय नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही गंभीर आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube