APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले

APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले

APMC Election Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती येत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरवात झाली होती. मतमोजणी शांततेत पार पडली. ही मतमोजणी इस्लामपूर पंचायत समितीच्या पाठीमागील शेतकरी बचत धाम मध्ये सुरु आहे. एकूण 13 टेबलांवर मतमोजणी सुरु असल्याने मतमोजणी जलद गतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

निवडणूक १८ जागांसाठी असून एकूण ३६ उमेदवार रिंगणात होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनल अशी लढत झाली. सर्व विरोधकांनी एकत्र येत राष्ट्रवादीला आव्हान दिले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रंजना बाराहाते यांनी काम पाहिले.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

छगन भुजबळ यांची सरशी

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेब यांचे वर्चस्व दिसून आले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवत छगन भुजबळ यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

भुजबळ यांच्या यांच्या शेतकरी विकास पॅनेलने दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर बाजी मारली आहे. छगन भुजबळ यांना सत्ता मिळत असली तरी विरोधी आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube