संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले, त्यांचं वक्तव्य…

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले, त्यांचं वक्तव्य…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे भाजपाचे पिल्लू असल्याचे म्हटले.

यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांचं जे काही वादग्रस्त वक्तव्य असेल ते सरकार तपासून पाहिल. त्यांचा आणि आमचा संबंध नाही. संभाजी भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते थोडीच आहेत. त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल सरकार ते तपासून पाहिल. त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

संभाजी भिडेचा बंदोबस्त करा – थोरात

संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संभाजी भिडेंना अटक करा – चव्हाण

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदाजनक असे असून, त्यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हण यांनी केली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube