भाजपकडूनच दंगली भडकवण्याचा प्रयत्न ; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

भाजपकडूनच दंगली भडकवण्याचा प्रयत्न ; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Prithviraj Chavan : रामनवमीच्या दिवशी राज्यासह देशात ठिकठिकाणी तणावाची परिस्थिती होती. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनात अनेक जण जखमी झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. या दंगली प्रकरणी विरोधी पक्षांनी भाजप (BJP) सरकारवर घणाघाती आरोप केले होते. या आरोपांचा सिलसिला अजूनही सुरू असून यामध्ये आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एन्ट्री घेतली आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.

Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार

ते म्हणाले, ‘रामनवमीच्या दिवशी अचानक दंगे फसाद करण्यात आले. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत यशाची खात्री नसते त्यावेळी ते दंगा करण्याचा जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून त्यांना आतापर्यंत जरी फायदा मिळाला असेल येथून पुढे मात्र मिळणार नाही. कारण, त्यांची ही अटकळ आता लोकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांच्या या खेळीत नागरिक फसणार नाहीत’, असे चव्हाण म्हणाले.

चव्हाण मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून आम्ही अतिशय मजबूत आहोत.’ कर्नाटक राज्य सरकारकडून सीमावर्ती भागात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तेथील मुख्यमंत्री विरोध करत आहेत. या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, ‘हा त्या सरकारचा प्रश्न आहे. मात्र, कर्नाटकडून जर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय केला जात असेल तर जनता आजिबात सहन करणार नाही. हा वाद अजून न्यायालयात प्रलंबित आहे. जो पर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला.

RBI कडून रेपो दरात वाढ नाही; सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे वादावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. ते म्हणाले, ‘वैयक्तिक वादात मला पडायचे नाही. आज राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि हे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे.’ असा आरोप त्यांनी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube