औरंगजेबाचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीच; ‘त्या’ घटनांची चौकशी करणार, फडणवीसांचा थेट इशारा
Devendra Fadnavis : राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर प्रकरणात आधिक खोलात जाण्याची गरज आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाष्य करत विरोधकांना थेट इशारा दिला.
Radhakrishna Vikhe Patil यांना हादरे देण्यासाठी बाळासाहेब थोरातांना कोल्हे गटाची रसद
फडणवीस म्हणाले, कोल्हापुरमध्ये प्रमुख विरोधी पक्षाचे नेतेच असे म्हणतात की मला माहिती आहे की येथे दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर काही तरुण औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करतात. त्यानंतर तेथे प्रतिक्रिया येते. या विधानांचा आणि या घटनांचा काही संदर्भ आहे का? अचानकणे महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे कोण आले?, कोण यांना फूस लावतंय?, कोण यांना अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्यास सांगत आहे?, याची देखील चौकशी आम्ही करत आहोत.
काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजत आहेत. सगळी चौकशी झाल्यानंतर काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आता फक्त इतकेच सांगतो की अचानक अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यात टिपू सुलतान आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू होणं हे काही सहज होत नाही. हा योगायोगही नाही. त्यात परत दंगली घडविण्याचा प्रयत्न आहे असे विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असूच शकत नाही, याच्या खोलात जावंच लागेल.
‘डबल इंजिन सरकार बैलगाडीपेक्षा हळू; तेलपाणी करायला दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागते’
विरोधी पक्षाचे लोक आता एकाच भाषेत बोलत आहेत. त्यानंतर विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. दंगलसदृश्य परिस्थिती जर कुठे झाली तर ती का होतेय तर एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून होतेय. पण येथे आम्ही औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. आता यांचे काही नेते औरंगजेबाला देशभक्त ठरवायला निघाले आहेत. हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता सगळेच एकाच वेळी एकाच सुरात कसे बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची देखील चौकशी करावी लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.