“मी नमस्कारही केला नाही भेटणं सोडाच”; भेटीचं वृत्त फेटाळत बाजोरियांचं ठाकरेंना चॅलेंज!

“मी नमस्कारही केला नाही भेटणं सोडाच”; भेटीचं वृत्त फेटाळत बाजोरियांचं ठाकरेंना चॅलेंज!

Maharashtra Politics : शिंदे गटाचे नेते विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट (Uddhav Thackeray) घेतल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Elections) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का (Eknath Shinde) देणार का अशीही चर्चा सुरू झालेली आहे. या प्रकरणात आता स्वतः गोपीकिशन बाजोरिया यांनी प्रतिक्रिया देत भेटीचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे.

विधिमंडळातील लॉबीमधून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) भेटून जात असताना समोरून उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येताना (Ambadas Danve) दिसले. पण मी त्यांना साधा नमस्कारही केला नाही भेटण्याची तर गोष्टच सोडा असे बाजोरिया म्हणाले. खोट्या बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः पुढे येऊन सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले. दीड वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दहा फोन केले होते ते सुद्धा आम्ही उचलले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर

शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विधानपरिषदेतून निवृत्त झालेले आमदार विप्लव बाजोरिया या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात दोन्ही नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आल्याचे या वृत्तात म्हटले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांनी पुन्हा शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ठाकरेंनी यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचेही या वृत्तात म्हटले होते.

आमदारकीचा कार्यकाळ संपून चोवीस तासही उलटत नाहीत तोच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना धक्का देणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, गोपीकिश बाजोरिया यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Devendra Fadnavis On Sharad Pawar: मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

शिंदेंना सर्वात आधी पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वी पक्षात जे बंड केलं होतं त्यावेळी विधानपरिषदेतून त्यांना सर्वात आधी विप्लव बाजोरिया यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर नीलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे, आमशा पाडवी या आणखी काही आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. विप्लव बाजोरिया आता नुकतेच विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. यानंतर आता गोपीकिशन बाजोरिया आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज