‘आता घोडामैदान जवळच आहे’; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

‘आता घोडामैदान जवळच आहे’; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्घावर निकाल (Maharashtra Political Crisis) दिल्यानंतर आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) खमंग चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने सरकारने हालचाली सुरू केल्या असून किती जणांना आणि कुणाला मंत्रीपदे मिळणार याची यादीही समोर आली आहे. असे असताना अनेक आमदारांची उत्सुकता वाढली आहे. त्यातच आता आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कडू म्हणाले, जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामं करतोय. मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं गरजेचं आहे ही जनतेची मागणी आहे.

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेते बंडखोरी करून भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. त्यावेळी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यांना मंत्रिपद मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. परंतु, मध्यंतरीच्या काळातील राजकीय घडामोडी, राज्यातील सत्तासंघर्ष थेट न्यायालयात पोहोचल्याने हा विस्तार रखडला होता.

आता हे सर्व अडथळे जवळपास दूर झाले आहेत. लवकरच विस्तार होईल अशी शक्यता दिसत आहे. कर्नाटकातील भाजपाच्या पराभवानंतर महाराष्ट्रात भाजप सावध पावले टाकत आहे. शिंदे गटाला आधिक बळकट करण्याच्या उद्देशाने काही जणांना केंद्रात मंत्रिपदे देणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात आणि केंद्रात अनेक घडामोडी घडतील अशी चिन्हे दिसत आहेत.

Sharad Pawar : उद्धव ठाकरे, मी अन् खर्गे बसून ठरवू! अप्रत्यक्षपणे राऊतांना दिला ‘शांत राहण्याचा’ सल्ला

दरम्यान, बच्चू कडू हे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सातत्याने नाराजीचे वक्तव्य करत आहेत. याआधीही त्यांनी अशीच वक्तव्ये केली होती. त्यामुळे शिंदे गटात सगळेच आलबेल नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. सध्याच्या मंत्रिमंडळात एकाच मंत्र्यांकडे पाच ते सहा जिल्ह्यांचा कारभार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube