पवारांनी दिली मोठी जबाबदारी, प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी पक्षासाठी सतत…

पवारांनी दिली मोठी जबाबदारी, प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी पक्षासाठी सतत…

Prafulla Patel : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पटेल यांना या नव्या जबाबदारीबद्दल विचारले. त्यावर पटेल म्हणाले, मी आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळत आलो आहे. माझ्यासाठी कोणतीही जबाबदारी साहेबांनी दिली तर ती जबाबदारी पार पाडणार. आजपर्यंत करत आलो येथून पुढे सुद्धा करत राहणार.

मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. ही चांगली गोष्ट आहे. यामुळे पवार साहेबांचा भार हलका होईल. सुप्रिया सुळे या फिरणाऱ्या नेत्या आहेत. संपूर्ण देशात फिरून त्या पक्षबांधणी करतील, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी दिल्ली येथे सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या. सुप्रिया सुळे या मुंबईत होत्या. तर अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल ही नेते मंडळी दिल्ली येथे शरद पवारांसोबत उपस्थित होती.

मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

मागच्या महिन्यात शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आपण पक्षाचा राजीनामा देणार असे म्हटले होते. त्यानंतर एकच कल्लोळ उडाला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत शरद पवारांनी राजीनामा घ्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर पक्षाच्या कमिटीने त्यांचा राजीनाम नामंजूर केला होता. या सगळ्यानंतर आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांनी थेट सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube