खाली मान अन् अस्वस्थ चेहरा : राष्ट्रवादीत भाकरी फिरताना अजितदादांच्या मनात काय?
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची देहबोली मात्र काही वेगळीच होती. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून अजित पवार यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मोठ्या घोषणेसाठी पक्षाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त शोधण्यात आला. या निर्णयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यात तसेच पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसत असले तरी काही असे प्रसंग घडले ज्यामुळे सारेच काही आलबेल आहे, असे म्हणता येत नाही. कारण, यावेळी अजित पवार यांच्यावर कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही.
राष्ट्रवादीची सुत्रे पटेल अन् सुप्रियाताईंकडे जाताना अजितदादांची देहबोली…. @AjitPawarSpeaks @PawarSpeaks pic.twitter.com/lJCfvnAfz7
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 10, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत शरद पवार भाषण करत असताना सर्व नेते त्यांचे भाषण ऐकत होते. त्याचवेळी अजित पवार मात्र खाली मान घालून बसल्याचे दिसत आहे. 17 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे.
अजितदादा नाराज आहेत का
अजित पवार प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले त्यामुळे ते नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्या मनात काहीही नाही. ते सुद्धा या कार्यक्रमात होते. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी पक्ष अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी अजित दादा कायमच सक्रिय राहिले आहेत. भविष्यात त्यांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एक नंबरचे स्थान मिळवेल.
अजित पवार पुन्हा नाराज? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं