मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमा झाले असून कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. येथे एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे.

जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन….; फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण

शरद पवार यांनी मुंबईत लोक माझे सांगाती पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेपासूनच राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर दोन दिवसांनी अंतिम निर्णय सांगतो असे पवार यांनी काल सांगितले होते.

त्यानंतर आज अध्यक्षपद निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला.

या बैठकीनंतर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो ‘, ‘देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. पवार साहेबांनी अध्यक्षपदी कायम रहावे, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव

कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. कार्यकर्ते आत्मक्लेष करत आहेत. येथे तर एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यकर्ता भिवंडी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत त्याला रोखले. येथील सध्याची तणावाची परिस्थिती पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube