मोठी बातमी ! जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

मोठी बातमी ! जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. मात्र, अनंत करमुसे प्रकरणात त्यांचे नाव आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही सुरू होती. अनंत करमुसे प्रकरणाच्यावेळी कदम हे आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते.

देशाला लुटणाऱ्या अदानीला का वाचवता ? ; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

अनंत करमुसे प्रकरणात त्यांचे नाव होते. या प्रकरणात त्यांच्यावर केस देखील सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येत होते. या चौकशीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत एबीपी माझा वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

दरम्यान, कदम यांनी आत्महत्या का केली, कशाने केली याची काहीच माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्यांनी आत्महत्याा केल्याची खात्रीशीर माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube