ऐश्वर्या माझ्या मुलीसारखी; आक्षेपार्ह विधान करणारे गावित नरमले; द्यावं लागणार स्पष्टीकरण
Maharashtra News : मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai)डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर आहेत, असे वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ उठला. विरोधकांनी गावित यांच्यावर सडकून टीका केली. वाद इतका वाढला की त्याची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत मंत्री गावित यांना नोटीस धाडली.
दरम्यान, वाद जास्तच वाढत असल्याचे पाहून गावित यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिले. ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मासे खाण्याचे म्हणजेच फिश ऑइलचे आरोग्यासाठीचे फायदे मी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले आहेत, हेच सांगण्याचा यामागचा उद्देश होता, असे गावित म्हणाले.
Modi Government : 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक, 2 लाख मेट्रिक टन खरेदीचा तोडगा वादात!
नेमकं काय म्हणाले होते गावित?
तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रायबद्दल, ती समुद्राच्या किनारी राहणारी. बंगलोरच्या समु्द्र किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे, तसे तुमचेहा डोळे होणार. हाही एक फायदा आहे. मासे खाल्ले ना तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, असे वक्तव्य मंत्री गावित यांनी केले होते.
गावितांना नोटीस, उत्तर देण्यासाठी तीन दिवस
या प्रकरणी आता गावित यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांना महिला आयोगाने जी नोटीस बजावली आहे त्याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना ज्या पद्धतीने उल्लेख केला ते निश्चित महिलांचा अपमान करणारे वक्तव्य होते. राज्य महिला आयोगाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत नोटीस पाठवली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
फडणवीसांचे ‘जलयुक्त शिवार’ जपानलाही भावले, थेट दिली डॉक्टरेट!