अजित पवारांचा गट ‘गद्दार’, दिल्लीत लागले बॅनर; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही एन्ट्री!

अजित पवारांचा गट ‘गद्दार’, दिल्लीत लागले बॅनर; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही एन्ट्री!

Sharad Pawar : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी एक घटना घडली आहे. बैठकीआधी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने कारवाई करत हे बॅनर आता काढून टाकल्याची माहिती मिळत आहे.

याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत फूट पाडून भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेते शिंदे गटाचा उल्लेख गद्दार म्हणून करत होते. विशेष म्हणजे, यामध्ये आता सरकारसोबत असलेल्या अजित पवार यांच्या गटातील नेत्यांचाही समावेश होता. आता याच नेत्यांसाठी गद्दार हा शब्द वापरण्यात येऊ लागला आहे.

Ahemadnagar News : सासरेबुवांनी धरली अजितदादांची वाट, तर जावयांचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात…

काल मुंबईत अजित पवार आणि शरद पवार गटाच्या बैठका झाल्या. यानंतर आता आमदार, खासदार, राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. पक्षावर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने आजची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

या बैठकीआधीच राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिल्लीत गद्दार असा उल्लेख करून बॅनर लावले आहेत. हे बॅनर पक्षाच्या कार्यालयाबाहेरही लावण्यात आले आहेत. मात्र दिल्ली पालिकेने कारवाई करत हे बॅनर काढून टाकले आहेत. या प्रकारामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही गद्दार शब्दाची एन्ट्री झाली आहे. पोस्टरमधून सगळा रोष प्रफुल्ल पटेलांवर असल्याचे दिसून येत आहे.

दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube