काँग्रेसमुळेच पवार साहेबांची पंतप्रधानपदाची संधी हुकली; अजितदादांचीही मोदींना साथ
Ajit Pawar : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. ग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या बैठकीत काँग्रेसला लक्ष्य केले होते. मोदींच्या या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मोदींवर जोरदार टीकाही केली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मोदींच्या वक्तव्याचे समर्थनच केले आहे. प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारला.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
ते म्हणाले, आम्ही 48 पैकी 38 खासदार निवडून आलो होतो. आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला होता. अंतर्गत मतदानही झालं होतं. परंतु, त्यावेळेस इतर राज्यातील काँग्रेसच्या खासदारांनी पी. व्ही. नरसिंहराव यांना पाठिंबा दिला होता. पवार साहेबांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिमंडळात सामील व्हावं लागलं.अशा प्रकारचे प्रसंग दोन ते तीन वेळेस आले होते. परंतु, यातून जे यश आपल्याला मिळायलं पाहिजे होतं ते यश मिळू शकलं नाही.
अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का? – राऊत
अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का, असे आम्ही म्हणालो का, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पवारांबाबत आदर आहे म्हणून त्यांचा पक्ष फोडला का, पंतप्रधान पदापासून पवारांना काँग्रेसने रोखले, मग अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का, असा सवाल राऊत यांनी केला. मोदींनाही आता सामना वृत्तपत्राची दखल घ्यावी लागत आहे. यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते.
मोदी नेमकं काय म्हणाले होते ?
गत महिन्यात भोपाळ येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र यानंतर त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले आणि शरद पवार यांचे कौतुक केले.