‘न्यायालयात अन्य निकाल मॅनेज होतात मग, मराठा आरक्षण’.. राऊतांचा सरकारला सरकारला सवाल

‘न्यायालयात अन्य निकाल मॅनेज होतात मग, मराठा आरक्षण’.. राऊतांचा सरकारला सरकारला सवाल

Sanjay Raut : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिक न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे.

राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) विरोधी पक्षनेते होते तेव्हा सत्तेत आल्यास दोन दिवसात आरक्षण देतो असे म्हणाले होते. त्यामुळे न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष होते. अन्य सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग राज्यातील एका महत्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्य मनासारखा का लागत नाही, असे राऊत म्हणाले.

Eknath Shinde : पुर्नविचार याचिका फेटाळली पण, मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध

फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, फडणवीस सत्ते नसताना म्हणाले होते की सत्तेत आल्यावर दोन दिवसांत आरक्षण देतो. आता तर गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या हातात सत्ता आहे. अशा वेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न असो की मराठा आरक्षण कोणताच निकाल मनासारखा लागत नाही. याचे कारण काय ? या विषयावर तुमची दातखिळ का बसली आहे ? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले, आमच्या हातातून धनुष्यबाण काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर घडतात मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठे कमी पडलात हे जनतेला एकदा सांगा, असे आव्हान राऊत यांनी यावेळी दिले.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, फडणवीस यांनीही आमच्या अभंगात सहभागी व्हावे. अभंगाची चेष्टा करू नये. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला उत्तर द्या, असे आव्हान त्यांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube