शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला; म्हणाले, खोटं बोलायचं पण, रेटून बोलायंच..

शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला; म्हणाले, खोटं बोलायचं पण, रेटून बोलायंच..

Sanjay Shirsat replies Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. तर 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून 9 खासदारही संपर्कात आहेत, असा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिरसाट म्हणाले, खोट बोलायचं, पण रेटून बोलायचं काम केलं जात आहे. त्यांच्याकडं चिन्ह, पक्ष आणि सत्ता नाही मग लोक त्यांच्याकडं कशाला जातील? अपात्र होणारे आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडं जाऊन मला अपात्र व्हायचं आहे का, पण, आमदारांना थांबविण्यासाठी वावड्या उठवल्या जात आहेत.

‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी पहा’; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

काय म्हणाले राऊत?

याआधी राऊत म्हणाले होते, शिंदे गटातील आमदार वैतागले आहेत. हे आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. 13 पैकी 9 खासदारही आमच्या संपर्कात आहेत. खासदार वैतागले आहेत. कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. इतर कोणालाही किंमत मिळत नाही, अशी आमदार आणि खासदारांची तक्रार आहे.

शिंदे गटातील असंतोष उफाळून येतो आहे. खोके मिळाले पण विकासकामे होत नाहीत. चार पाच मंत्री सोडले तर कुणालाही विकासकामांसाठी निधी मिळत नाही हा मोठा असंतोष शिंदे गटात असून तो लवकरच उफाळून बाहेर येईल. उद्धव ठाकरेंना फसवलं गेलं होतं त्यांचं पितळ आता उघड होईल. आजपर्यंत किरीट सोमय्या यांनी ज्या तक्रारी केल्या त्या फक्त बदनामी करण्यासाठीच केल्या आहेत. त्याच्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. एनजीटीने अनिल परब यांना जी क्लिन चीट दिली आहे त्यातून हे सिद्ध होत असल्याचेही राऊत म्हणाले होते.

Ahmednagar Name Change : आता अहिल्यादेवी होळकर नगर! CM शिंदेंची थेट घोषणा

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube