रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांना शाबासकी; म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदेंची…

रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांना शाबासकी; म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदेंची…

Ramdas Athawale : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या जाहिरातबाजीवर सडकून टीका करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दोन्ही नेत्यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

’54 टक्के लोक तुमच्या विरोधात, तुमची जाहिरातही खोटीच’; दानवेंचा शिंदेंवर घणाघात

मंत्री आठवले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या जाहिरातींबद्दल प्रश्न विचारला. त्यावर आठवले म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगले सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची जशी लोकप्रियता आहे तशीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आहे. आणि माझी सुद्धा आहे. देशात माझेही काम सुरू आहे. शिंदेंची लोकप्रियता राज्यात वाढली आहे तर त्यांनी अशाच पद्धतीने चांगले काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे.

दोघांचीही चांगली लोकप्रियता आहे. दोन्ही नेत्यांत चांगला समन्वय असून त्यांच्या समन्वयातून सरकार चालले आहे. त्यांच्यात कसलीही नाराजी नाही. मागे देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांमुळे हे सरकार स्थापन झाले आहे. शिंदेंना मुख्यमंत्री करणे आवश्यक असल्याने फडणवीस दोन पावले मागे आले. ते मंत्रिमंडळात सुद्धा राहणार नव्हते. पण, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आग्रह केला. मोठं मन करून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, असे आठवले म्हणाले.

नगर जिल्हा विभाजनाला शिंदे-फडणवीसांचा ठेंगा? शिर्डीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube