राजकारणातील भूकंपावर आंबेडकर ठाम; म्हणाले, सगळेच आता सांगितले तर..

राजकारणातील भूकंपावर आंबेडकर ठाम; म्हणाले, सगळेच आता सांगितले तर..

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) दोन मोठे बॉम्बस्फोट होतील असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात जाणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आंबेडकर म्हणाले, मी अजूनही माझ्या विधानावर ठाम आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोठा भूकंप होतो त्यावेळी त्याचे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप मात्र होता होता राहिला, असे माध्यमांनी म्हटले आहे. मी यावर अधिक काही बोलणार नाही. भाष्य करणार नाही. माझे जे वक्तव्य आहे की राज्यात दोन भूकंप होणार त्यावर मी आजही कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सगळे सांगणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

काय म्हणाले होते आंबेडकर ?

राज्यातील सरकार कोसळणार का, अजित पवार मुख्यमंत्री होणार का, तसेच ते भाजपात प्रवेश करणार का ?, असे थेट प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले होते. त्यावर आंबेडकर म्हणाले, ‘पंधरा दिवसात बरेच मोठे राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण पंधरा दिवसांची वाट पाहू या. पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन बॉम्बस्फोट होणारच आहेत’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

सुळेंनीही सांगितले दोन भूकंप होणार

राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का ? हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनीही याबाबत एक मोठा दावा दोन दिवसांपूर्वी केला होता. राजकारणात दोन भूकंप होतील पण,एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात असेल, असे त्या म्हणाल्या होत्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube