Maharashtra Rain : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मुसळ’धार, दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी…
Maharashtra Rain : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एका मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Maharashtra Rain) देण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलायं. त्यामुळे आता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून पुणे आणि रायगडच्या घाटमाध्यावर अतिमुसळधार पाऊस होणार आहे. सिंधूदुर्ग, पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, रायगडग, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली, जालन्यात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 16.96 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
तसेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरात भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे. जून महिला कोरडा गेला तरीही जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे.
’मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये अनासपुरेंच्या कॅमिओची कमाल! एका संवादात गुंफले 15 चित्रपट
नागपूरमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मराठवाड्यात तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना 29 जुलै रोजी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. आज गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.