Maharashtra Rain : रत्नागिरीत पावसाच्या सरी! कोकणासह विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट…

Maharashtra Rain : रत्नागिरीत पावसाच्या सरी! कोकणासह विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट…

Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तर कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलायं. तसेच उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात यलो अलर्ट देण्यात आलायं.

चित्रा वाघांसोबत काम करणार का? रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘आम्ही विचारधारेबरोबर…’

कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर चांगलाच असून कोकणातील पाणीसाठ्यांमध्ये मोठी झालीय. पावसाचा जोर कायम असल्याने रत्नागिरीतलं शीळ धरण पूर्ण भरलं असून ओसंडून वाहत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता रत्नागिरीकरांची पुढील एक वर्षांसाठीची पाण्याची मिटलीयं.

राष्ट्रवादीत ‘शरद पवार’ एकमेव बॉस! अजित पवार, पटेल, तटकरेंसह 8 आमदारांना मोठा धक्का

कोकणासह, मुंंबई, मुंबई उपनगरासह पालघर जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला असून पावसामुळे शहरांतील काही भागांत पाणी साठलंय. त्यामुळे शहरातील वाहतुकीला अडथळा येत आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्यालाही पावसाने चांगलाच आशिर्वाद दिला आहे.

Ahmednagar News : ज्वालाग्रही पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला पेट, 4 जण होरपळले..

हिंगोली, जळगाव, जिल्ह्यांनाही पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आल्याची परिस्थितीत आहे. हिंगोलीतल्या वसमत इथल्या ओढ्याला पूर आल्याने पुरात अडकलेल्या काही शाळकरी विद्यार्थ्यांना मानवी साखळीच्या सहाय्याने बाहेर काढले आहे. तर दुसरीकडे जळगाव शहरातील मेहरुन परिसरातील आणि तांबा पूर परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कोकण भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून हवामान विभागाकडून आज कोकणासह विदर्भात ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube