Maharashtra Rain : गुडन्यूज! आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आजपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पावसाचा (Maharashtra Rain) जोर राहणार आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस होईल, असे सांगण्यात येत आहे.
जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी बातमी आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल असे सांगितलेच होते. विभागाचा अंदाज सध्याची परिस्थिती पाहिली तर खरा ठरताना दिसत आहे.
तसे पाहिले तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांत पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काल नाशिक आणि चंद्रपूर शहरात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. शहरात आज सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता.
Maharashtra Rain : मान्सून अॅक्टिव्ह! आज ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट