एकनाथ शिंदे-रश्मी ठाकरेंची भेट?; श्रीकांत शिंदेंनी सांगितलं खरं काय ते
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी दोघे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, या भेटीच्या बातम्या धादांत खोट्या असून अशी कोणतीच भेट झालेली नाही, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे.
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट आले होते. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातीलच सदस्यांनी शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. अचानक भेट घेण्याचे कारण काय, तेजस आणि रश्मी ठाकरे यांनी का भेट घेतली असे प्रश्न उपस्थित केले जात होते.
This is a LIE. No secret meet.
Hon. CM Shri Eknath Shinde and Rashmi Thackeray ji NEVER met as shown on @NSMaharashtra. This is DESPERATION, nothing else. FALSE news.
We will Complain to Twitter and Police – several accounts spreading deliberate FAKE news & lies today This…— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) May 5, 2023
भेटीचे वृत्त धादांत खोटे
एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त निराधार आणि धादांत खोटे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही.
लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar Resignation : पवारांनी भाकरीऐवजी तवाच का फिरवला? जयंत पाटलांनी सांगितलं कारण…