‘तेव्हाच ठरवून टाकलं महाराष्ट्रातच काम करायचं’; अजितदादांनी सांगितला दिल्लीतला ‘तो’ अनुभव

‘तेव्हाच ठरवून टाकलं महाराष्ट्रातच काम करायचं’; अजितदादांनी सांगितला दिल्लीतला ‘तो’ अनुभव

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार माध्यमांना काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे अजितदादा नाराज आहेत अशा बातम्या चालल्या. या बातम्यांचे खंडन राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली.

ते म्हणाले, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. 1991 साली बारामतीकरांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर मी सहा महिने तेथील चित्र पाहिलं. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक आहे. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून आजपर्यंत मी इथेच काम करतोय. सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात. राज्यातील जनतेसाठी काम करतोय.

दिल्लीतून पुण्यात येईपर्यंत काय घडलं?

ते म्हणाले, मी शक्यतो दिल्लीला कधी जात नाही. मात्र यावेळी बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे मी तिथे गेलो होतो. या निर्णयाबद्दल मी कालच माझं मत स्पष्ट केलं होतं. ट्विट सुद्धा केलं होतं. दिल्लीला 11 वाजता बैठक होती. मी छगन भुजबळांना भेटलो. दोघांना एकाच वेळी बोलावलं असल्यानं सोबतच गेलो. पण माध्यमांना काहीच माहिती नसते. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे.

रोहित पवारांना मोठा धक्का; कर्जत बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात

दुपारी 4 वाजताची माझी पुण्यासाठी फ्लाईट होती. त्यामुळे लवकर आवरून मी विमानतळावर पोहोचलो. पण तिथे काही कारणांमुळे उशीर झाला. त्यानंतर मी पुणे विमानतळावर आलो. येथेही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी होतेच. त्यावेळी माझ्याकडे मेसेज आले होते की अजित पवार यांना काहीच जबाबदारी दिली नाही अशा बातम्या चालविल्या जात आहेत. पुण्यात विमानतळावर मी माध्यमांना उत्तर दिले.

मुळात माझ्याकडे राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. या पदावरील जबाबदारीचे काम मी करत आहे. पण, मीडिया माझ्या इतका का प्रेमात पडलाय हे मला कळत नाही. माझ्याबाबत ज्या बातम्या येतात त्यांचे खंडन करण्यातच वेळ जातो. 15 तारखेला काही जण राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत त्यासाठी मी धुळ्याला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत कार्यक्रम आहेत तेथेही जाणार आहे.

Ajit Pawar : फडणवीस म्हणतात धूळफेक, अजितदादा म्हणाले, त्यांचं काम फक्त…

त्यांच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही

देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. भाजपनं काय करावं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे तसं राष्ट्रवादीनं काय करावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची कार्यकारिणी, आमदार, खासदार त्याबद्दलचा निर्णय घेतील. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. टीकाटिप्पणी करणे हे त्यांचं काम आहे त्यामुळे ते बोलतात. पण, त्याकडे फार महत्व दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube