Maharashtra Shikhar Bank Scam :शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ईडीकडून आरोपपत्र

Maharashtra Shikhar Bank Scam :शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ईडीकडून आरोपपत्र

Maharashtra Shikhar Bank Scam : महाराष्ट्र शिखर बँक (Maharashtra Shikhar Bank), राम गणश गडकरी कारखाना आणि जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्या प्रकरणी आज ईडीकडून (ED) राज्यातील तीन बड्या पक्षांच्या नेत्यांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षातील एकूण 14 नेत्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

महाराष्ट्र शिखर बॅंकत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळा प्रकऱणात ईडीने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत ईडीने मार्चमध्ये चार्जशीट दाखल केली होती. या प्रकरणात अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचा संबंध असल्याचं बोलल्या जातं होतं. मात्र, नंतर त्यांचे नाव यातून वगळण्यात आलं. आज ईडीकडून पुन्हा दोन चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत.

तुम्ही ट्विस्ट करु नका; कोणती भाजप आवडते? उत्तरावरुन सुधीर मुनगंटीवारांचा युटर्न 

यात राम गणेश गडकरी साखर कारखाना प्रकरणात प्राजक्त तनपुरे आणि रणजित देशमुख यांची नावे समोर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरी चार्टशीट जालना कॉ. स. साखर कारखाना प्रकरणी दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली.

या चार्टशीटमध्ये माजी मंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय समीर मुळे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नावांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली. तर तापडिया बिल्डर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जुगल किशोर तापडिया यांच्या नावाचाही याच प्रकरणात समावेश आहे.

आज ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 नेत्यांची नावं समोरआळी असून या नेत्यांच्या अडणीत वाढ झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube