Maharashtra tableau : कर्तव्यपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला पारितोषिक मिळाले आहे.
‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहभाग घेतला होता.#Tableau#RepublicDayParade #चित्ररथ pic.twitter.com/QPPYLbTN5P
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 30, 2023
संचलनामध्ये सहभागी झालेल्या 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. याचा पहिला क्रमांक उत्तराखंडचा दुसरा महाराष्ट्राचा तर तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशला मिळाला आहे.
यंदाच्या वर्षीचा महाराष्ट्राचा चित्ररथ ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर होता. या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. गोंधळींचं जे प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत.
त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या होते. एकूणच महाराष्ट्राची पारंपारिक लोककला कर्तव्यपथावर सादर करण्यात आली होती.