देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार

देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार

Car Accident : राज्यात रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. मायणी-दहिवडी मार्गावरी धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान ओमनी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, कुरोली आणि बनपुरी येथील लोक सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी येथे देवदर्शनासाठी मारुती ओमनी गाडीतून निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर येथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरूआ आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक करत आहे. दरम्यान, सध्या रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube