जागा वाटप, निवडणुकांचे टप्पे अन् अजितदादांचा…; अनौपचारिक गप्पांमध्ये CM शिंदेंनी सगळं सांगून टाकलं
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. (CM Eknath Shinde On Maharashtra Vidhansabha Election)
विधानसभा निवडणूक! भाजपची रणनीती ठरली; 21 नेत्यांवर जबाबदारी, तर गडकरींच्या हाती कमान
स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार असून, येत्या 8 ते 10 दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचेही शिंदेंनी सांगितले. विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करत नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होईल असा अंदाजही शिंदेंनी वर्तविला आहे.
उमेदवारी कशी दिली जाणार?
वर्षावरील अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार आहे.
जरांगे अन् माझे चांगले संबंध, त्यांनी मुंबईत यावे चांगला शेवट करू; शिंदेंच्या शिलेदारीची ग्वाही
अजितदादांच्या गुलाबी रंगावरही केलं भाष्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या तोंडावर राज्यभर जन सन्मान यात्रा काढली आहे. यासाठी त्यांनी गुलाबी रंग वापरला असून, प्रत्येक ठिकाणी अजितदादा गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलेले दिसून येत आहेत. दादांच्या या रंगावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर भाष्य करत मला गुलाबी होण्याची गरज नाही माझ्या कपड्यांचा रंग पांढरा असल्याचे म्हटले आहे. तर, शिंदेंच्या या प्रतिक्रियेवर अजितदादांनी पांढरा रंग सर्वात चांगला आणि स्वच्छ असतो असे म्हणत हे बघा मी आज पांढरं शुभ्र घातलेलं असून, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात ते योग्य असल्याचे अजितदादांनी शिंदेंच्या विधानावर बोलताना म्हटले आहे.
जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षीस; शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अजितदादांकडूनही जोरदार मागणी
तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला फटका बसलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महायुतीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेसाठी 80 ते 90 जागा मागितल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घातल नसून, अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची याबाबत चर्चा होत असते असेही भुजबळ म्हणाले. या नेत्यांनी नेमक्या किती जागा मागितल्या याबाबत ठोस माहिती नाही पण साधाऱ ण80 ते 90 जागा मागितल्या आहेत. आता यावर का निकाल येतो याबाबत मला कल्पना नाही.