Manipur violence : राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मणिपूरमध्ये अडकलेले 25 विद्यार्थी सुखरूप परतले

Manipur violence : राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मणिपूरमध्ये अडकलेले 25 विद्यार्थी सुखरूप परतले

Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे.

दरम्यान मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली होती. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आता या विद्यार्थ्यांना राज्य सरकार विमानाने महाराष्ट्रात आणले आहे. एकूण 25 विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप परतले आहेत.

मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…

या विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं सोमवारी रात्री हे विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत फोनवरून चर्चा केली. त्यावेळी या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत करण्याचं अश्वासन दिलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. लवकरच या विद्यार्थ्यांचा तेथून सुटका करण्यात येईल असे अश्वासन त्यांनी यावेळी दिलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube