हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत उभी फूट; दादांचा आमदार ठाकरेंच्या मोर्चात लावणार हजेरी

Thackeray March Against Hindi Compulsion : हिंदीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद (Hindi) पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची भूमिका एकच आहे. राज्यात हिंदीची सक्ती नाही, तर मराठीची सक्ती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, तर अनिर्वाय असा शब्द आम्ही हटवला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी थेट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. आता अजित पवार गटाचे आमदारही बोलले आहेत. त्यामुळे महायुतीत उभी फुट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला हजर राहण्याची तयारी मिटकरींनी दर्शवली आहे. दरम्यान, मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्ही नेते एकत्र येऊन दौरा (मोर्चा) काढत असतील, तर त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल, असं मला वाटतं. शेवटी मराठी आपली भाषा आहे, आपली अस्मिता आहे. दोघांनीही पक्षविरहित मोर्चा काढण्यासाठी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल, तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
Thackeray is brand! एकच अन् एकत्रित मोर्चा; संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ
पाच किंवा सहा तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा ठरत आहे. जर त्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज नसेल, तर मी त्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होईन, असं अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. शनिवार, पाच जुलै रोजी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. याची वेळ आणि ठिकाण हे दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवणार आहेत. मिटकरी यांच्या या निर्णयामुळं महायुतीमध्ये उभी फुट पडल्याचं चित्र आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 5 जुलैच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. यात उद्धव ठाकरेंना बोलवणार का? याबाबत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत तेही आलेच ना असा प्रतिप्रश्न करत, त्यांच्याशीही मी बोलणार आहे.